- *१)शिवसेनेनं शब्द पाळला*
- पणजी मधून उत्पल पर्रिकर यांच्याविरोधातील शिवसेनेची उमेदवारी मागे; संजय राऊत यांचं ट्वीट संजय राऊतांनी केलेल्या ट्वीट मध्ये आपण पणजीतील शिवसेना उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांची उमेदवारी मागे घेत असून पणजीतील शिवसैनिक देखील उत्पल पर्रीकर यांच्या मागे उभे राहतील.
- 2)विक्रम गोखले यांचे प्रेक्षकांना हात जोडून आवाहन*
- प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पहावा, भिकार सिरीयल पाहणे बंद करा, वेळ वाया घालवू नका, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगलं करण्याच्या मागे लागतील असे विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.
- 3)वाईन प्रकरणी अण्णा संतापले*
- व्यसनाधीनतेला रान मोकळे करुन देणारा निर्णय; सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावरुन अण्णा हजारेंचा संताप
- ४)शरद पवार कोरोनामुक्त
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मी कोरोनामुक्त झालो आहे असे ट्विट करून सांगितले. तर ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर या देखील कोरोनामुक्त झालेल्या आहेत. यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.