बोठेच्या जामिनावर आता उद्या निकाल!रेखा जरे हत्याकांडातला मुख्य आरोपी बाळ बोठेच्या जामीन अर्जावर आज (दि. १५) सुनावणी झाली. उद्या निकाल देण्याचे जाहीर केले.

सरकारी वकील सतीश पाटील आणि बोठेचे वकील महेश तवले यांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला.

दरम्यान, दोन्ही वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बोठेच्या जामीन अर्जावर उद्या अर्थात बुधवारी (दि. १६) निकाल जाहीर करण्याचा निर्णय दिला.

बोठेचे वकील अॅड. तवले यांनी असा युक्तीवाद केला, की बोठे हे पत्रकार असून हनी ट्रॅपच्या मालिकेत नाव छापल्याच्या रागातून सागर भिंगारदिवे याने रेखा जरे खूनप्रकरणात बाळ बोठेचं नाव सांगितलं.

सरकारी वकील अॅड. पाटील यांनी असा मुद्दा उपस्थित केला, की पोलिसांनी हनी ट्रॅपप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे रेखा जरे खूनप्रकरणाशी हनी ट्रॅपचा काहीही संबंध नाही.

भिंगारदिवे याने रागातून बोठेचं नाव घेतलं असेल तर मग त्या दोघांचे फोन काॅल्स आणि बैठकाचं काय? रेखा जरे यांच्या घरातून मिळालेल्या पत्रात बोठेविषयी आरोप आहेत.

हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी जयमाला माने यांनीही बोठेपासून जीवाला धोका असल्याचं पोलिसांना निवेदन दिलंय. जरे यांच्या मुलानेही बोठेविरुध्द गंभीर आरोप केले आहेत.

त्यामुळे रेखा जरे यांची हत्या बाळ बोठेनंच केली असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील अॅड. पाटील यांनी केला. या दोन्ही वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बोठेच्या जामीन अर्जावर उद्या निकाल देण्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here