बोठेच्या घराला कुलूप, अवघ्या काही मीटरवरचा ‘ संशयीत ‘ कसा काय सापडेना ?

    बोठेच्या घराला कुलूप, अवघ्या काही मीटरवरचा ‘ संशयीत ‘ कसा काय सापडेना ?नगर येथील गाजलेल्या ‘ गर्भपाताच्या गोळ्या ‘ साठा प्रकरणात मुख्य आरोपी असलेला नितीन जगन्नाथ बोठे याच्या शोधासाठी पोलिस त्याच्या टीव्ही सेंटर येथील बंगल्यावर गेले असताना कुटुंबासह तो फरार झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. बोठे याच्या एजन्सीचा परवाना रद्द करण्याची कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटरवर असलेला रहिवासी असलेला नितीन बोठे अचानकपणे गायब होतो त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एमआयडीसी इथे गर्भपाताच्या गोळ्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला होता त्यावेळी या गोळ्या हरियाना येथून श्रीराम एजन्सी नावाने आल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीचा मालक नितीन बोठे यास अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस बजावली होती. नोटीस हाती पडल्यानंतर बोठे याने खुलासा करताना या गोळ्या आपल्या नाहीत असे सांगत तपासाला सहकार्य केले नाही म्हणून त्याच्या विरोधात विभागाकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक गुरुवारी बोठे याच्या टीव्ही सेंटर येथील बंगल्यावर गेले असता बंगल्याला कुलूप आढळून आले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी एमआयडीसी मधील दूध पावडर भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती आलेला नाही तर गर्भपात गोळ्यासारख्या प्रकरणातील आरोपी देखील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तोफखाना पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही मीटरवर रहिवासी असलेला नितीन बोठे अचानकपणे फरार होतो आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सापडत नसल्याने तपास गांभीर्याने सुरु नसल्याचे दिसून येत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here