बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल

654

Prem Chopra : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या अनेक दिवसांत बॉलिवूड कलाकारांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. आता बॉलिवूड अभिनेता प्रेम चोप्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रेम चोप्रा यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दोघेही लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. प्रेम चोप्रा 86 वर्षांचे आहेत. चोप्रा यांच्या तब्येतीत होणारी सुधारणा लक्षात घेता त्यांना पुढील एक-दोन दिवसांतच डिस्चार्ज मिळेल, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर डॉ जलील पारकर  उपचार करत आहेत. त्यांनी मागील 60 वर्षांत 350 हून अधिक सिनेमे केले आहेत. ‘प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोप्रा’ हा बॉबी सिनेमातला त्यांचा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here