बेलवंडी येथील शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार आरोपी जेरबंद:

बेलवंडी येथील शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद,बेलवंडी येथील शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि, मे २०२१ मध्ये फिर्यादी श्री. राजाराम चंदर ढवळे, वय ४४ वर्षे, धंदा- शेती, रा. राजापूर शिवार, ता. श्रीगोंदा यांचे राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत असलेल्या गट नं. १४० मधील शेत जमिनीमधून काही आरोपी संतोष राधू शिंदे व त्याचे साथीदारांनी अंदाजे १२,००,०००/- रु. किं. ची माती बळजबरीने चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पो.स्टे. येथे आरोपी विरुध्द फिर्याद दाखल केलेली होती. त्याचा राग मनामध्ये धरुन दि. ०२/०९/२०२१ रोजी आरोपी नामे अक्षय सोनवणे, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर याने व त्याचे साथीदारांनी फिर्यादी यांचे ढवळगाव येथून अपहरण करून लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्याबाबत बेलवंडी पो.स्टे. येथे गुरनं. ३६६ / २०२१ भादवि कलम ३२६, ३६४, ३२४, ४०५, ५०६, ३४ प्रमाणे आरोपी अक्षय सोनवणे व त्याचे साथीदाराविरुध्द दाखल करण्यात आलेला होता.वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य अक्षय सोनवणे हा फरार झाला होता. नमुद फरार आरोपीचा पोनि/ अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, आरोपी अक्षय सोनवणे हा एका पांढऱ्या रंगाचे महिन्द्रा एक्सयुव्ही गाडी नं. एमएच १६ बीएम ७००१ या गाडीमधून औरंगाबाद – अहमदनगर रोडने अहमदनगर शहराचे दिशेने येत आहे आता लागलीच खडका फाटा टोलनाका येथे सापळा लावल्यास मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि/ गणेश इंगळे, पोहेकों/भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, फकीर शेख, पोना/सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, रवि सोनटक्के, पोकॉ/ जालिंदर माने, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून खडका फाटा टोलनाका येथे जावून सापळा लावून आरोपी नामे अक्षय सुभाष सोनवणे, वय- २५ वर्षे, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. असून पुढील कार्यवाही बेलवंडी पो.स्टे. करीत आहेत.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here