बेकायदेशीर बायोडिझेलची विक्री,आरोपींचे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज ; सुनावणी दि.27 ला
अहमदनगर : कोतवाली पोलिस व जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने दि 22 ऑक्टोंबर रोजी बाह्यवळण रस्त्यावर केडगावनजिक छापा घातला होता. या कारवाई दरम्यान बेकायदेशीर बायोडिझेल विकणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुतेंसह अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली.शहराच्या केडगाव उपनगरनजिक बाह्यवळण रस्त्यावरील ढाब्यांवर बेकायदेशीर बायोडिझेलची ट्रक चालकांना विक्री करणाऱ्या गुन्ह्यातील 7 आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्यासमोर दाखल अर्जावर सुनावणी चालू आहे.आरोपी विक्रांत वसंत शिंदे यांनी ॲड. सतीशचंद्र सुद्रिक यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे.
शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी ॲड. सतीश गुगळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आरोपी मयूर बडे, महेंद्र कोळेकर, कुणाल नरसिंधानी, रोशन माखिजा, विशाल रमेश भांबरे यांनी ॲड. महेश तवले, ॲड. संजय दुशिंग, ॲड. विक्रांत शिंदे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केले आहेत.
या जामिन अर्जावर शनिवारी (दि.27) सुनावणी होणार आहे.