बॅडमिंटन : नगरात राज्य पातळीवर बॅडमिंटन लोकचा शानदार समारोप

    164

    नगर ः अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशन, योनेक्स सनराईज व स्वर्गीय शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे वयोगट 15 व 17 वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय जिल्हा व वैयक्तिक अजिंक्यपद बॅडमिंटन ( Badminton ) स्पर्धा नुकतीच झाली. मुलींच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्याबद्दल नगरमधील खेळाडू श्रीया राठोड व श्रावणी पाटील यांना आमदार जगताप यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. 

    या स्पर्धेचा समारोप व बक्षिसाचे वितरण नगरमधील वाडिया पार्क बडमिंटन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत वाड, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड अशोक कोठारी, सुजाता कोठारी, संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद फिरोदिया, विक्रम फिरोदिया असोसिएशनचे सचिव मिलिंद कुलकर्णी, सदानंद कुलकर्णी, चेतन बोगावत, अशोक सोनीमंडलेचा यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. 

    उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आमचे वडील स्व. शांतिलालजींच्या बॅडमिंटन खेळाची आवड होती. खेळांच्या स्पर्धांमध्ये आता अधिक स्पर्धात्मकता वाढीस लागली आहे. खेळाडूंनी नवनवीन व्यायाम तंत्रज्ञानाचा खेळाच्या निवडीप्रमाणे अवलंब करावा, तसे प्रशिक्षण ठरविले आहे.खेळामधील सातत्यता कायम ठेवाल तर निश्चितच यश पदरात पडेल. नगरमधील उदयोन्मुख एक मुलगा व एक मुलगी मी दत्तक घेण्याचे जाहीर करत आहे. या संधीचा या निवडलेल्या खेळाडूंनी पुरेपूर फायदा घ्यावा, राज्य राष्ट्रीय पातळीवर नगरचे नाव उंचवावे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने दरवर्षी अशा स्पर्धांच्या आयोजनाची नगरला संधी द्यावी, असे त्यांनी सांगितले.

    स्पर्धेचा निकाल 
    मिश्र दुहेरी- 
    17 वर्षे 

    विजेते कृष्ण जसुजा व युतिका चव्हाण

    उपविजेते प्रणय गाडेवार व निशिका गोखे

    मिश्र दुहेरी

    15 वर्षे  

    विजेते इशान वानखेडे तन्वी घारपुरे 

    उपविजेते ओजस जोशी व जुई जाधव 


    मुले दुहेरी

    17 वर्षे

    विजेते ओम गवंडी व सर्वेश यादव 

    उपविजेते अर्जुन बिराजदार व आर्यन बिराजदार 

    दुहेरी मुले

    15 वर्षे 

    विजेते अवधूत कदम व ऋतुवा सजवान 

    उपविजेते तनय जोशी व यश ठोंबरे 

    मुली दुहेरी

    15 वर्षे 

    विजेत्या रिद्धिमा सरपटे व शौर्य मडावी 

    उपविजेत्या केतकी थिटे व तन्वी घारपुरे 

    मुली दुहेरी

    17 वर्षे 

    विजेत्या श्रावणी वाळेकर व तारिणी सुरी 

    उपविजेत्या निशिका गोखे व युतिका चव्हाण 

    मुली एकेरी

    17 वर्ष 

    विजेती रिधिमा सारपटे 

    उपविजेती दक्षिणी पाटील 

    मुले एकेरी

    15 वर्षे 

    विजेता देव रुपरेलिया 

    उपविजेता ऋतुवा सजवान 

    मुले : एकेरी

    17 वर्षे 

    विजेता सर्वेश यादव 

    उपविजेता अमेय नकलोडे 

    मुली एकेरी

    17 वर्षे 

    विजेती तारिणी सुरी 

    उपविजेती ईशा पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here