मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा झाला. यावेळी राज्य शासनातर्फे संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था शतायुषी होत आहे हे समाधान वेगळे असून संस्थेचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द, चिकाटीने काय करू शकतो हे संस्थेने दाखवले. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी रुग्णांना जीवनदान देण्याचे काम अहोरात्र करत असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले