बुधवार दि. २३/११/२०२२ रोजी वीज वितरण कंपनी कडून होणारा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाले बाबत

    300

    कळविण्यांत येते की, शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळानगर, विळद पंपीग स्टेशन येथे विळद
    जलशुध्दीकरण केंद्र परिसरात ‘बु-हाणनगर व चाळीसगाव योजनेच्या उपसा केंद्रावर बिघाड झाल्यामुळे विज वितरण
    कंपनी कडून बुधवार दि. २३/११/२०२२ रोजी दुपारी २.४० वाजले पासून वीज पुरवठा खंडीत झालेला असून अद्याप
    पावेतो विद्यूत पुरवठा सुरळीत झालेला नाही.पाणी उपसा बंद राहिल्याने आज दि. २३/११/२०२२ रोजी रोटेशन नुसार स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर, कायनेटीक चौक परिसर, लक्ष्मी कृपा हाउसिंग सोसायटी, प्रियंका कॉलनी, इत्यादी भागास होणारा पाणी पुरवठा गुरूवार दि. २४/११/२०२२ रोजी नियमित वेळेत होईल. दुरूस्ती कालावधी दरम्यान शहरात पाणी येउ शकणार नाही.त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.
    परिणामी गुरूवार दि. २४/११/२०२२ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच
    तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, माणिकचौक, आनंदी बाजार, नवी पेठ, कापड
    बाजार इत्यादी भागास पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने होणार आहे.
    त्याचप्रमाणे गुरुवार दि. २४/११/२०२२ रोजी रोटेशन नुसार होणारा सारसनगर, बुरूडगाव रोड भागातील पाणी
    पुरवठा शुक्रवार दि. २५/११/२०२२ रोजी नियमित वेळेत होईल.
    पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चोक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणी पुरवठा शुक्रवार दि. २५ / ११ / २०२२
    रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.
    तसेच मुकुंदनगर, लक्ष्मीनगर, अर्बन बँक कॉलनी, निर्मलनगर, सुर्यनगर, शिवाजीगर इत्यादी उपनगरास एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होईल.
    तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य
    करावे.

    आपले नगरसेवक

    गणेश पुंडलिक भोसले
    उपमहापौर, अहमदनगर मनपा

    प्रकाश भागानगरे
    नगरसेवक

    सौ.शितलताई संग्रामभैय्या जगताप
    नगरसेवक

    सौ.मीनाताई संजय चोपडा
    उपसभापती, महिला बालकल्याण समिती
    मनपा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here