बुद्धिबळ : नगर शहरातून प्रवेश ग्रँडमास्टर घडणार : नरेंद्र फिरादिया

    180

    नगर : ”अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ (Chess) संघटना बुद्धिबळाच्या प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध आहे. नगरमध्ये नुकत्याच एक दिवशीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. एक दिवसीय स्पर्धेमध्ये १९० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला हाेता. निरनिरळ्या वयोगटातील खेळाडूंना बुद्धिबळ स्पर्धेतून (Chess Championship) प्रोत्साहन मिळणार आहे. आता लवकरच नगर (Nagar) शहरातून ग्रँडमास्टर (Grandmaster) घडणार आहे,” अशी भावना अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली.

    अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ (Chess) संघटना आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच नगर येथील सप्तक सदन येथे पार पडल्या. एक दिवशीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व एल अँड टीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन झाले. यावेळी क्रीडा मार्गदर्शक खुरांगे, उमेश देवकर, दिलीप आढाव, संघटनेचे सचिव यशवंत बापट, सुबोध ठोंबरे, श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, अनुराधा बापट, सागर गांधी, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, प्रकाश गुजराथी, मनीष जसवानी, नवनीत कोठारी आदी उपस्थित हाेते.

    अरविंद पारगावकर म्हणाले, ”मोबाईलपासून मुलांना लांब ठेवायचे असेल, तर बुद्धिबळासारखा दुसरा खेळ नाही. बुद्धिबळ (Chess) खेळाने ज्ञानाची प्रगती होऊन भविष्यात आपण स्वतः आपले निर्णय घेण्यात समर्थ हाेताे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे कौतुक करत एल अँड टी कंपनीच्या वतीने बुद्धिबळ संघटनेला पुढील स्पर्धेसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

    क्रीडा मार्गदर्शक खुरांगे म्हणाले, ”क्रीडा सप्ताह सध्या सुरू आहे. त्यातच राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच येणार आहे. त्यानिमित्त या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे कौतुक केले. संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी भारताचा नवोदित ग्रँडमास्टर प्रज्ञानानंद हा जागतिक उपविजेता ठरल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.” या स्पर्धेमध्ये १९० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे सूत्रसंचालन सुबोध ठोंबरे यांनी केले. श्याम कांबळे यांनी आभार मानले.                                                      

    स्पर्धेतील विजयी खेळाडू

    या स्पर्धेत ९ वर्षाखालील गटात प्रथम दर्श पोरवाल, द्वितीय ऋषिकेश राठोड, तृतीय अंश सोनवणे, रियान बोरा, समर्थ जोशी, अंजू भालेराव, देवराज खाणारे, हर्ष सदवाणी, अजिंक्य गायकवाड, दक्ष मेहत्रे. १४ वर्षांखालील गटात प्रथम आदित्य सातव, द्वितीय स्वराज काळे, तृतीय पीयूष धस, अन्या महामुनी, संस्कार गडाख, परेश मुथा, सक्षम जोशी, आर्यन देवडे, कनक जामगावकर, आर्यन देवकर. १९ वर्षांखालील गटात प्रथम आयूष वाघ, द्वितीय अर्पण सोनवणे, तृतीय आयुष अय्या, श्रीराज इंगळे, रुद्र जाजू, गौरव पगारे, आदेश देखने, सुजित लंगे, वरद जोशी, लाभेश तळरेजा. मुलींचा गटात प्रथम वेदांती इंगळे, द्वितीय इशिता जामगावकर, तृतीय भक्ती दगडे, प्रचिती चिवटे, पलस तपले, स्वानंदी महाजन, प्रांजली आव्हाड, राधा पंजाबी, अंजली बेदी, मुक्ता मनोत. खुल्या गटात प्रथम आशिष चौधरी, द्वितीय हर्ष घाडगे, तृतीय आदित्य गद्रे, वेदांत पानसरे, दीपक सुपेकर, आयूष अंतरे, सचिन कांबळे, गिरीश सारवणकर, ओमकार बापट, सुनील जोशी. नगर तालुक्यातील खेळाडू प्रथम नितीन सोळंकी, द्वितीय दादासाहेब सदाफल,  तृतीय हर्षल राजभोसले, ऋषिकेश चव्हाण, अद्वैत महाजन आदी.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here