बीड जिल्ह्यात कालपासून पावसाने हजेरी लावलीय. जवळपास 25 दिवसांच्या खंडानंतर पावसाने कमबॅक केलं आहे.
सध्या सुरू असलेला पाऊस हा खरिपाच्या तोडणीला आलेल्या पिकांसाठी नुकसानदायी ठरतोय.
जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील राजेवाडी येथील बंधारा दुथडी भरून वाहत आहे. तर परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात चांगल्या पावसाने हजेरी लावलीय.
25 दिवस पावसाने ओढ दिल्यानं खरिपाची पिकं धोक्यात आली होती. आता जी पिकं ऐन काढणीला आली होती त्याच माञ यात नुकसान झाले आहे