? मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या सुसाईड नोट बाबत धक्कादायक माहिती आली समोर
? गेल्या काही आठवड्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय राजकीय पटलावर गाजत होता. अशातच मराठा आरक्षणासाठी बीडमधील विवेक राहाडे नामक एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली.
❗ या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेली त्ती सुसाईड नोट बनावट असल्याचे उघड झाले आहे.
? विवेक राहाडे नावाने ती सूसाईड नोट अवघ्या महाराष्ट्रभर फिरली. त्या सूसाईड नोटवरून अनेक चर्चाही झाल्या. औरंगाबादेतल्या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालाने दिल्याने चिठ्ठीमधला फोलपणा समोर आला आहे. तपासा दरम्यान आढळून आलेल्या माहितीत पोलिसांनी सदर सुसाईड नोट बनावट असल्याचे सांगितले आहे.
? या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात सामाजिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल केला आहे.
❓ नेमकं काय लिहिलं होतं त्या बनावट सूसाईड नोटमध्ये
मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.