बीएसएफ जवान ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर :-अहमदनगर जिल्ह्यातील ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे.
पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगर तालुक्यातील ससेवाडीतील काळे बीएसएफमध्ये कार्यरत आहेत.
२०१९ पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीला आहे. फेसबुक आणि व्हॅटस्अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काळे यांची एका पाकिस्तानी महिला एजंटाशी ओळख झाली. त्यानंतर काळे याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॅटसॅप ग्रुप तयार केला. त्या पाकिस्तानी महिला एजंटालाही ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले.
त्यामुळे ग्रुपवर पोस्ट केली जाणारी माहिती तिला आपोआप कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कोठे आहेत, काय हालचाली होणार आहेत, गस्त कोठे असणार आहे. याची माहिती जवान ग्रुपवर देत असत. ती त्या महिलेला मिळत होती. ऑगस्ट २०२० पासून हा प्रकार सुरू होता.
या हेरगिरीची माहिती कळाल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामद्ये सत्यता आढळून आल्यांनतर पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने काळे याला अटक केली.
त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचा पंजाब पोलिसांचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here