
केंद्रीय निवडणूक आयोगाने बीएलओचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण देशातील अनेक राज्यात मतदार याद्यांची स्पेशल इन्टेसिव्ह रिव्हिजन सुरु आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने बीएलओचे मानधन सहा हजारांवरुन बारा हजार केले आहे. याशिवाय बीएलओ सुपरवायझरचे मानधनही बारा हजाराहून अठरा हजार करण्यात आले आहे.



