बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर

    838

    बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर

    नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली. बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपत लोकशाहीचा अधिकार वापरण्याची संधी देण्यात आली आहे. नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल, असंही सुनील अरोरा म्हणाले.

    बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निवडणुकीचे निकाल समोर येतील. दरम्यान, बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मतदानाचा हक्क बजवावा. हा निर्णय नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर लागू लागू होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ती थर्मल स्कॅनर लावण्यात येणार आहे. जवळपास 46 लाख मास्कचा वापर करण्यात येईल. सोबतच पीपीई वापर करण्यात येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here