बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच हिंसक, दगडफेकीनंतर पॅसेंजर ट्रेनला लावली आग

577

पाटणा – बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच हिंसक झाले आहे. आज हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत उग्र आंदोलन केले. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरुवातीला गया जंक्शनवर उभ्या असलेल्या श्रमजीवी एक्स्प्रेसवर दगडफेक केली. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीमार करून या विद्यार्थ्यांना पांगवल्यावर त्यांनी स्टेशनवर आधीपासून उभ्या असलेल्या एका ट्रेनच्या डब्यांना आग लावली.

गया जंक्शनवर गोंधळ घातल्यानंतर या विद्यार्थ्यांनी करीमगंजजवळ आधीपासून उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला या विद्यार्थ्यांनी लक्ष्य केले. तसेच ट्रेनच्या डब्यांना आग लावली. त्यामुळे ट्रेनचे काही डबे जळाले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने जिल्हा पोलीसआणि रेल्वे पोलिसांनी मोर्चा सांभाळला आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी सातत्याने रेल्वेच्या परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र सध्यातरी घटनास्थळावरील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दरम्यान,  रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. १४ जानेवारी रोजी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे.  यादरम्यान, विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या इंजिनाला आग लावल्याची घटनाही घडली होती.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here