बिग बॉसमधून एक्झिट…राजकारणात एन्ट्री, तृप्ती देसाई करणार नव्या इनिंगला सुरुवात

662

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून प्रत्येक आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जात असतो. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. तृप्ती देसाईंनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेताना लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. 

या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये कालच्या भागात मीनल आणि विशाल सेफ झाले होते. त्यामुळे जय, सोनाली आणि तृप्ती देसाई यांच्यापैकी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार हे निश्चित होते. त्यामुळे घराबाहेर कोण जाणार याकडे प्रेक्षकांचेदेखील लक्ष लागले होते. शेवटी जय दुधाणे आणि तृप्ती देसाई डेंजर झोनमध्ये गेले होते. पण अखेरीस तृप्ती देसाईंना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.या निर्णयामुळे घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. 

आजच्या भागात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांनी दिवाळी निमित्त खास भेटवस्तू पाठवल्या होत्या. त्यामुळे सदस्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. चुगली बूथद्वारे घरातील कोणत्या सदस्याने कोणत्या सदस्याकडे चुगली केली आहे ते आजच्या भागात पाहायला मिळाले. तर आजच्या बिग बॉसच्या चावडीमध्ये विकास, जय आणि विशालने प्रेक्षकांची अतरंगी डिमांडदेखील पूर्ण केली.

बिग बॉस मराठीच्या घरातील नाती प्रत्येक टास्कनंतर, टास्क दरम्यान बदलताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामुळे बर्‍याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडणं होत आहेत. येणारा नवा आठवडा कसा असेल? मीरानंतर घरात कॅप्टन कोण असेल? कोणते सदस्य नॉमिनेट होणार आहेत? घरात आणखी कोणते टास्क रंगणार आहे याची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here