बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला!

बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला!

बाळ बोठेला दिलासा नाहीच!
बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातला ‘मास्टर माईंड’ पत्रकार बाळ बोठे याला आज (दि. १६) कुठलाच दिलासा मिळू शकला नाही. दोन्ही वकिलांचा युक्तीवाद काल (दि.१५) ऐकल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (दि. १६) फेटाळला.

रेखा जरे यांच्या हत्याकांडात बोठेचे नाव निष्पन्न झाल्यापासून तो फरार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात बोठे याच्या वकीलाने अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावली झाली, या दरम्यान बोठेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी आरोपी फिरोज राजू शेख (वय 26 रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24 रा. कडीत फत्तेबाद ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25 रा. तिसगाव फाटा कोल्हार ता. राहता),

सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर केडगाव अहमदनगर), ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा. प्रवरानगर ता. राहाता) आदी पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

पोलिस तपासात निष्पन्न झाल्यापासून बाळ बोठे हा फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here