बालिकाश्रम रोड कवडे नगर येथे ॲड.धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून व आमदार स्थानिक विकास निधीतून ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

675

बालिकाश्रम रोड कवडे नगर येथे ॲड.धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून व आमदार स्थानिक विकास निधीतून ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
शहरात अनेक वर्षांपासून विविध प्रश्‍न प्रलंबित होते ते सोडवण्याचे काम सुरू आहे. मूलभूत प्रश्नांपासून कामाला सुरुवात करावी लागली आहे. एक-एक प्रश्न कमी करण्याचे काम सुरू आहे. आता सध्या शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्त्यांचा प्रश्न बनला आहे, लवकरच हाही प्रश्न मार्गी लावू. विकासाचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्ये आहे. ॲड.धनंजय जाधव हे नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात असे प्रतिपादन याप्रसंगी व्यक्त केले.

कचऱ्याचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे त्यामुळे आपले शहर कचरा कुंडी मुक्त झाले आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला पुढील दोन महिन्यांत शहरातील पथदिव्यांचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहर प्रकाशमय होणार आहे. तसेच मुळा धरणातुन येणाऱ्या अमृतपाणी योजनेचा काम अंतिम टप्प्यात आले असून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या सुरू करून फेज 2 पाणी योजनेद्वारे पुढील काळात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे, सध्या शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे त्यामुळे रस्ते खोदले गेले असल्याने ठीक-ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,विविध रस्त्यांची कामे हे मंजूर आहे परंतु पावसाळा सुरू असल्यामुळे ही कामे करता येत नाही पुढील काळात शासनाकडून शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरण कामासाठी भरघोस निधी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले.
ॲड.धनंजय जाधव म्हणाले की, आमदार संग्राम जगताप हे पक्षविरहित काम करणारे नेतृत्व आहे आजच्या युवकांना त्यांच्या कामातून प्रेरणा मिळते आम्ही सुद्धा त्यांच्या कामाला प्रेरित होऊन प्रभागांमध्ये विकास कामे करत आहोत,कवडे नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला लवकरच हे काम मार्गी लागणार आहे. आमदार संग्राम जगताप हे वेळोवेळी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अभिजित ढोणे,सत्यनारायण धुत,चंद्रकांत चव्हाण,दत्तात्रेय घोडवकर,धोंडीराम खांडेकर,सुरेश बोथरा,सुभाष दाळवाले,प्रकाश बोरकर, नानासाहेब शिंदे,पोटे गुरुजी,प्रतीक गांधी,योगेश गांधी,भाऊ गंधे,भाऊ पुंड,ज्ञानेश्वर घावटे,निलेश व्यवहारे,धीरज शेराल,प्रतीक रासकर,लक्ष्मीबाई धुत,मंदाबाई पोटे,कमलाबाई धुत,शोभा बोरकर,स्वाती भटेवाडा, अलका शेपाळ आदी उपस्थित होते.

Ahmednagar #Development

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here