बालगृहातून अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
नगर पुणे रोड वरील केडगाव उपनगरातील भूषण नगर येथील संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली बालगृह येथुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणांसाठी सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलास अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.
ही घटना सोमवारी (दि.3) घडली. जाकीर शाहीद अंसारी ( वय १७ वर्षे, रा.श्रीरामपुर, जि.नगर) असे अपहृत बालकाचे नाव आहे.या प्रकरणी सावली बालगृहाचे अधीक्षक अजिंक्य दिलीप आंधळे ( वय 27 रा. भूषणनगर, केडगाव अ.नगर मूळ राहणार जवखेडे ता.पाथर्डी जि. अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात इसमांविरूध्द भारतीय दंड विधान कायदा कलम 363 प्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार बी एम ईखे करीत आहे.