बारा वर्षीय अल्पवयीन पुतणीवर काकानेच केला बलात्कार :

972

देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना व नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर याचे सर्वत्र प्रतिसाद उमटत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. आजोबाच्या अंत्यविधीच्या दिवशीच कुटुंब शोकात बुडालेले असताना दुसरीकडे घरातीलच चुलत काकाने 12 वर्षीय पुतणी वर अंधार्‍या रात्रीत अमानुष अत्याचार केला या घटनेचे तीव्र निंदा केली जात असून समाज वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोंडपिपरी तालुक्या पासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला गावात मोरेश्वर राऊत यांच्या वडिलांचे काल निधन झाले .दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी अंतविधी ला आलेल्या पाहूण्यासह जेवण करायला बसले असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतनी वय 12 वर्ष हिच्यावर काळी नजर ठेवली.
पाहुण्याला जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर निघाली असताना कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी कमलाकर राऊत वय २६ वर्ष याने तिला ओढत घराजवळच असलेल्या सांदवाडीत नेले व तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला काहीवेळात मुलीचे वडील मोरेश्वर राऊत हे घराबाहेर लघुशंकेला निघाले असताना त्याला आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर यांने पळ काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here