बाधित क्षेत्र 3 हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभकलोवा

    54

    पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी ६४८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ८, १३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख १२ हजार १७७शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here