
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बहुचर्चित केकताई जंगल खुन प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी सीताफीने अटक केली आहे. तोफखाना पो.स्टे. येथे दाखल असलेला गु. रजि.नं. 204/2025 भारतीय न्याय संहिता कलम 140 (3),140(1), 103 (1),238, 61 (2) प्रमाणे दि.27/02/2025 रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील फरार आरोपीनामे ऋत्विक उर्फ सोनु घोडके, रा.एम.आय.डी.सी.ता, जि अहिल्यानगर हा गुन्हा दाखल झाले पासुन पसार होता व पोलीसांना वेळोवेळी हुलकावनी देत होता. त्याचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक तयार केले होते.
सदर आरोपी हा पोलीसांना दरवेळी हुलकावणी देत असे. परंतु दि. 07/05/2025 रोजी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी नामे ऋत्विक उर्फ सोनु हा पारगांव, ता श्रीगोंदा येथे त्याच्या नातेवाईकाकडे येणार आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पो.हे. कॉ सुनिल चव्हाण, पो.कॉ. बाळासाहेब भापसे यांना तोंडी सुचना देवुन बातमीप्रमाणे आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले असता गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पारगांव, ता श्रीगोंदा येथे त्याचे नातेवाईकाच्या घरासमोर वेष बदलुन सापळा लावुन नमुद गुन्ह्यातील आरोपीची खात्री होताच तो पळण्याच्या तयारीत असतानाच त्यास शिताफिने ताब्यात घेतले.
व त्यास नमुद गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतले असुन त्यास सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. आनंद कोकरे तोफखाना पो.स्टे अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व त्यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.



