बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा: लाखो रुपयांचा बनावट माल जप्त: पाथर्डी पोलीस स्टेशन ची कारवाई.

पाथर्डी- तालुक्यातील जांभळी गावात ऊसाच्या शेतात सुरु असलेला बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. पाथर्डी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यांनतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी कारवाई केली.

याप्रकरणी आरोपी विजय बाबुराव आव्हाड (वय ३८) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोनि सुहास चव्हाण, सपोनि प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, कौशल्यरामनिरंजन वाघ, पोलीस ना. अनिल बडे, पोकॉ भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, देवीदास तांदळे,सागर मोहिते, भारत अंगरखे, राजेंद्र सुदृक, मपो प्रतिभा नागरे,राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बी टी घोरताळे, ए बी बनकर, एस बी विधाटे, पोकॉ एन एस उके, यु जी काळे, एस व्ही बिटके, मपोकॉ एस आर आठरे,महसुलचे विजय बेरड, सदानंद बारसे, देविदास फाजगे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वी केली.

पोलीस,राज्य उत्पादन शुल्क आणि महसूल विभागाच्या पथकाने मिळून कारवाई केली.बनावट तयार केलेली दारू, रिकाम्या बाटल्या, झाकणे, दारू बनवण्याचे रसायने व इतर साहित्य, दारूचे बॉक्स, छापलेले लेबल, खाकी बॉक्स,बाटली सिल करण्याची मशीन, पाणी फिल्टर,पाण्याची टाक्या, स्पिरीट,पाण्याचे मोटार, विविध कंपन्यांचे बॉक्सवर नाव छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.दारू बनवण्यासाठी लागणारे विषारी रसायन मिळून आले आहे.

ऊसाच्या शेतात बनावट, विषारी दारूचा कारखानाच्या कारवाई पूर्वीही शिक्षक कॉलनीत देखील बनावट दारु बनवण्याचा कारखाना उध्वस्त केला होता. पोना अनिल बडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय आव्हाड यांच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here