बंगालच्या उपसागरात असानी चक्रीवादळ?; १३० वर्षांनी दुर्मीळ घटना

880
  • आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे
  • १३० वर्षांनी दुर्मीळ घटना
  • पुणे : आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हंगामातील पहिल्या चक्रीवादळाचे नामकरण श्रीलंकेच्या सूचनेनुसार ‘असानी’ असे करण्यात येईल.
  • हिंदी महासागराच्या क्षेत्रात मार्च महिन्यात चक्रीवादळ तयार होणे ही तुलनेने दुर्मीळ घटना असून, या आधी १८९१ ते २०२० या १३० वर्षांच्या काळात फक्त आठ वेळा मार्चमध्ये चक्रीवादळांची नोंद झाली होती. त्यांपैकी सहा वादळे बंगालच्या उपसागरात, तर दोन अरबी समुद्रात तयार झाली. मार्चमध्ये नोंदल्या गेलेल्या आठपैकी सहा चक्रीवादळांची तीव्रता समुद्रावरच कमी झाल्याचे दिसून आले.
  • आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार आग्नेय बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात गुरुवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. पुढील तीन दिवसांत या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. समुद्रावरून उत्तरेकडे सरकताना या क्षेत्राचा प्रवास अंदमान निकोबार बेटांच्या जवळून होणार असल्यामुळे या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसू शकतो. २१ तारखेला हंगामातील पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, २२ मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here