बँक खाते, निगेटिव्ह बॅलन्स आणि नियम!
आपले बँक खाते, त्याच्याशी संबंधित सगळे नियम, त्याचबरोबर आपली बँक आपल्याकडून कधी दंड आकारू शकते, या बाबतीत पूर्ण माहिती खातेदार म्हणून आपल्याला असणे गरजेचे असते.
? आज आपण निगेटिव बॅलन्स असल्यानंतर कोणते नियम असतात आणि निगेटिव्ह बँक खाते म्हणजे नेमके काय याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
▪️खात्यात पैसे नसतील तर ईएमआय संदर्भातील रिक्वेस्ट बाउंस व्हायला सुरुवात होते. परिणामी बँकेकडून काही प्रमाणात शुल्क आकारले जाते. खातेदार बँकेचे लोन फेडण्यासाठी असमर्थ असला तर बँकेकडून हे खाते निगेटिव्ह खाते म्हणून घोषित करण्यात येते.
▪️राष्ट्रीय नियमानुसार खातेदाराचा दंड बँकेने माफ केला आहे त्या खातेदाराचे अकाउंट बंद करता येते.
▪️निगेटिव्ह बॅलेन्स असणाऱ्या खातेदाराला एक वर्षाची मुदत देण्यात येते आणि त्यानंतर संबंधित बँक खाते इनऍक्टिव्ह समजले जाते.
▪️कोणतेही कर्ज नसेल तर ते खाते बंद करता येते. मात्र त्याआधी बँकेला या व्यवहाराचा पूर्ण अभ्यास करणे देखील बंधनकारक असते.
▪️12 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्या खात्यावर कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन झाले नाही तर ते खाते डॉर्मंट खाते म्हणून घोषित करण्यात येते.
▪️प्रत्येक बँकेचे खाते बंद करण्यासाठी असणारे नियम वेगवेगळे असतात. एचडीएफसी सारखी बँक 14 दिवसांच्या आत खातेदाराने बँक खाते बंद केले तर कोणतेही शुल्क आकारत नाही.
▪️कोटक महिंद्रा या बँकेत 31 ते 181 दिवसांच्या कालावधीत बँक खाते बंद करायला 600 रुपये दंड आकारला जातो.
▪️ॲक्सिस बँक मध्ये पंधरा दिवस ते वर्षाच्या आत पाचशे रुपये दंड आकारून खाते बंद करता येते.
➖➖➖➖➖➖➖






