बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक प्रकरणी आरोपीस जामीन

728

अहमदनगर – अहमदनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या चितळे रोड आणि नेप्ती शाखेतील थकीत कर्ज प्रकरणी आरोपी प्रसाद बाळासाहेब गुंड यांच्या विरुद्ध तोफखाना आणि नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सत्र न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्तता केली आहे. (1 crore 78 lakhs of cheating bail in the cheating case Bank of Maharashtra)
आरोपी गुंड यांनी 2014 साली बँकेच्या नेप्ती शाखेतून 80 लाख आणि 2015 साली चितळे रोड शाखेतून 98 लाख असे एकूण 1 कोटी 78 लाख रुपये व्यवसायिकामी कर्जरूपाने घेतले. परंतु सदर रकमेचा वापर नमूद कारणासाठी न करता स्वतःच्या फायद्या कमी केला. या कारणास्तव बँकेचे झोनल मॅनेजर यांनी सदर आरोपीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे 2018 मध्ये दाखल केले होते. सदर आरोपी तीन वर्षे फरार होता. त्यास पोलिसांनी नोएडा (उत्तर प्रदेश) येथे जाऊन अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here