- बँकशी संबंधित महत्त्वाचे काम असल्यास, तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया.. अर्थात ‘आरबीआय’ने फेब्रुवारी महिन्यात बॅंकांना असणाऱ्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील बॅंकांना 7 दिवस सुटी असणार आहे..
- प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँकांना सुटी दिली जाते. ‘आरबीआय’कडून दर महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर करण्यात येते.. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात फक्त 21 दिवसच बॅंका सुरु असतील. त्यामुळे सुट्यांची यादी पाहूनच बॅंकेतील कामाचे नियोजन करा, नाहीतर कामाचा खोळंबा होऊ शकतो..!
- कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून, अनेक जण आता ऑनलाईन व्यवहार करण्यास पसंती देत आहेत. बॅंकांची बरीचशी कामे डिजिटली होत असल्याने बॅंकांच्या पायऱ्या चढण्याची वेळ येत नाही. मात्र, तरीदेखील आवश्यक कामासाठी बँकेत जायचे असेल, तर आधी बँकांच्या सुट्ट्या तपासूनच घराबाहेर पडा.
- *फेब्रुवारीतील सुट्ट्यांची यादी*
- ▪️ 6 फेब्रुवारी: रविवार
- ▪️ 12 फेब्रुवारी : शनिवार (महिन्याचा दुसरा)
- ▪️ 13 फेब्रुवारी: रविवार
- ▪️ 19 फेब्रुवारी : शिवजयंती – बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद
- ▪️ 20 फेब्रुवारी: रविवार
- ▪️ 26 फेब्रुवारी : शनिवार (महिन्याचा चौथा)
- ▪️ 27 फेब्रुवारी: रविवार





