फातिमा शेख यांची आज 191 वी जयंती

610

फातिमा शेख यांची आज 191 वी जयंती.सावित्री बाई फुले यांच्या खांद्याला खांदा देत या माऊलीने स्त्री शिक्षणाचा पाया या देशात रचला.फातिमा शेख यांच्या बंधूंनी म्हणजेच उस्मान शेख यांनी,महात्मा फुले यांना शाळेसाठी सर्वात प्रथम आपली जागा दिली,आणि या देशात स्त्री शिक्षणाचं नव युग सुरू झाले.सावित्री बाईंच्या सोबत फातिमा शेख यांनी देखील शेणगोळे खात या देशात स्त्री मुक्तीच्या पहाटेसाठी स्वतःला झोकून दिले होते.आज गुगल ने त्यांना Doodle च्या माध्यमातून अभिवादन करत अनोखे अभिवादन केले आहे.सावित्री बाई फुले आणि फातिमा शेख ही जोडी मला हिंदू मुस्लिम एकतेचे,या देशाच्या संस्कृतीची ओळख वाटते.सावित्री बाई यांच्या इतकेच फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा,अस माझं मत आहे.फातिमा शेख यांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र अभिवादन..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here