फटाके स्कुटरवरुन नेत असताना जबरदस्त स्फोट, पिता-पुत्राचा मृत्यू

916

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वडील आणि मुलगा कुठूनतरी परतत असताना फटाक्यांमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की त्यात स्कूटरचा चक्काचूर झाला, पिता-पुत्राचा जागेवरच मृत्यू झाला

दिवाळी ही प्रत्येकासाठी खूप खास आणि वेगळी असते. या दिवशी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतो. दिवाळीच्या काही दिवस आधी अप्रतिम वातावरण असते. दिवाळीच्या दिवशी अचानक स्फोट झाला किंवा स्फोटात कोणीतरी मरण पावले अशा घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. असाच एक धक्कादायक अपघात समोर आला आहे, ज्यामध्ये वडील आणि मुलगा रस्त्याने जात होते आणि त्यांच्या हातात फटाके होते, काही वेळाने एवढा मोठा स्फोट झाला की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (Firecracker Blast Puducherry viral video father son death due to bursting of firecrackers)

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमित कुमार सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, “तामिळनाडूत दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या स्फोटामुळे पिता-पुत्राचा मृत्यू, मुलगा ज्या स्कूटरवर बसला होता, त्या स्कूटरमध्ये स्फोट झाला, ज्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

व्हिडीओ पाहा:

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वडील आणि मुलगा कुठूनतरी परतत असताना फटाक्यांमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की त्यात स्कूटरचा चक्काचूर झाला, पिता-पुत्राचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचवेळी रस्त्यावरून जाणारे अन्य 3 जण जखमी झाले. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here