प्रेयसीला भेटायला आला अन पोलिसांनी धरला, – प्रेयसीसाठी भेटायला तो आला त्याची ओळख पटली अन तात्काळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या अशी घटना नगर जिल्ह्यात शहरात घडलेली असून कुख्यात गुन्हेगार राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी ( वय 28 राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर ) याला अटक करण्यात आली आहे. औरंगाबादच्या जवाहर नगर पोलिसांच्या विशेष पथकाने श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असून औरंगाबाद इथे आकाशवाणीजवळ मंगळसूत्र चोरल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात त्याने तोंडावरचा मास्क काढला होता त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून त्याची ओळख पटवत त्याला अखेर श्रीरामपूर इथे जेरबंद करण्यात आले आहे .शहानुर मिया दर्गा परिसरात एक फेब्रुवारी आणि आकाशवाणी जवळ दहा मार्च रोजी पप्पू याने साथीदारांसोबत मंगळसूत्र हिसकावून नेले होते. सदर प्रकरणाचा जवाहरनगर पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना त्यांनी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी आरोपीची ओळख पटली मात्र त्यानंतर त्याचे लोकेशन पोलिसांना आढळून येत नव्हते. त्याच्या फोन कॉलचा अभ्यास करत आणि त्याच्या प्रेयसीचे लोकेशन याचा तपास एकत्र जुळवत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. सतत गावठी कट्टा त्याच्यासोबत असल्याने पोलिसांनी देखील मोठी खबरदारी घेत त्याला अटक केली आहे. पोलिसांचे पथक आपल्या मागावर आहे याची त्याला जाणीव होती त्यामुळे तो काळजी घेत होता मात्र तरी प्रेयसीच्या घरात गेल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पप्पूला अटक केली त्यावेळी त्याच्या प्रेयसीने मोठा गोंधळ देखील घातला असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पप्पू हा कुख्यात गुन्हेगार असून खुनासह त्याच्यावर दरोडा, मंगळसूत्र चोरी असे सुमारे 14 गुन्हे दाखल आहेत तर त्याच्या साथीदारांवर 24 गुन्हे दाखल असून त्यातील 19 गुन्हे तब्बल मंगळसूत्र चोरण्याचे आहेत. तो आणि त्याचे मित्र सातत्याने गावठी कट्टा सोबत बाळगत असल्याने तसेच याआधी त्याने पोलिसांवर देखील गोळीबार केलेला असल्याने त्यामुळे त्याला पकडणे हे पोलिसांसाठी देखील मोठे आव्हान होते. औरंगाबाद पोलिसांनी श्रीरामपूर पोलिसांना मदतीला घेत ही कारवाई केली असून सदर प्रकरणी पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
लवकरच हवेत उडणारी बस येणार, गडकरीचं भरसभेत जनतेला आश्वासन
प्रयागराज - देशातील 5 राज्यांत निवडणुका होत असून गोव्यात पहिल्या टप्प्यातच 40 जागांसाठी मतदान झाले आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात...
बस, लोकल आणि मेट्रोचं आता एकच कार्ड; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एनसीएससी कार्डचं लोकार्पण
NCSC Card: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आता बस, लोकल आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता तिन्ही वाहतुकींसाठी...
Ahmednagar Politics : माजी आ. सुधीर तांबेंसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी ! काँग्रेसमध्ये घरवापसी...
Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकारण जसजसं लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसतसे वेगाने फिरू लागले आहे....
धक्कादायक! बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या
भंडारा - बारावीच्या वर्गात शिकणार्या एका विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग...






