अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कोल्हार गावाचे रहिवासी सोमनाथ शांताराम निबे वय ५७ रा. कोल्हार असे या आत्महत्या केलेल्या प्राध्यापकचे नाव आहे. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. लोणी येथील विखे कनिष्ठ महाविद्यालयात ते कार्यरत होते.
निभे यांचा मृतदेह त्यांच्या वस्तीवरील विहिरीत शनिवारी सकाळी आढळून आला. विहिरीजवळच त्यांची मोटारसायकल उभी होती.
निबे यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करत आहेत.





