मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत गडाख मित्र मंडळ यांच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी सामुदायिक महाभिषेकाचे आयोजन
बेलपिंपळगाव येथे श्री रोकडोबा हनुमान मंदिरात मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत गडाख मित्र मंडळ यांच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी सामुदायिक महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते.गोरगरिबांच्या सुखदुःख मध्ये धावणारे, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे, तरुणांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व सामाजिक कार्याची आवड निर्माण करणारे, नेत्रदान चळवळ, मुलींचे दत्तक पालकत्व,गाव तेथे वाचनालय, वृक्ष लागवड या उपक्रमाची रुजूवात करणारे प्रशांत गडाख अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त अाहेत.
त्यांना लवकर परत सेवेत हजर व्हावे म्हणून बेलपिंपळगावचा नवसाला पावणारा रोकडोबा मारुती मंदिरात महाभिषेक करुन नवस कबुल करण्यात आला.
या वेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, सरपंच चंद्रशेखर गटकळ ,उपसरपंच बंडूपंत चौगुले, भीमजी साठे,राजेंद्र साठे, वसंत भद्रे,बाळासाहेब शेरकर,प्रा रमेश सरोदे, कृष्णा शिंदे ग्रामपंचायत सदस्य, किशोर गारुळे,वसंत कांगुणे,सकाहरी शिंदे, लक्ष्मण भद्रे,हरीश वरघुडे, गोविंद शिंदे, प्रभाकर चौगुले, सोपान औटी, बाबासाहेब रोटे आदी उपस्थित होते.





