प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल

** *अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार आहे.* ? अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान 50 टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्‍यक होते. ? *आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला 45 टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी 40 टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.* ? सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 45 टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 40% असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here