• नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना • प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध उपाययोजना नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यातील सर्व आगारांना संपाच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे पुढीलप्रमाणे खाजगी बस, स्कूलबस व जीप टाईप वाहने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 120, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 43, दि. 10 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 126, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 52, दि. 11 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 116, स्कूल बस 9, जीप टाईप वाहने 45, दि. 12 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 122, स्कूल बस 17, जीप टाईप वाहने 63 याप्रमाणे एकुण खासगी बस 484, स्कूल बस 40 तर जीप टाइप वाहने 203 उपलब्ध करुन दिली आहेत.संप कालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने याबाबत प्रवाशांच्या काही तक्रारी असल्यास किंवा जादा भाडे दर आकारले असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02462-259900 / mh26@mahatranscom.in यावर संपुर्ण तपशीलासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.संपाच्या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी परिवहन विभागातील अधिकारी, पोलीस वाहतूक शाखेचे निरीक्षक, एस.टी. खात्यातील वरिष्ठ अधिकारी व खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस व इतर वाहन संघटना यांच्या प्रतिनीधीची बैठक आज आयोजित केली होती. प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व एसटी महामंडळाचे आगार प्रमूख यांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात बेमुदत संप पुकारला असल्यामुळे राज्य शासनाच्या गृह विभाग (परिवहन) यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 9 आगार असून 540 बसेसच्या माध्यमातून दररोज 80 हजार प्रवासी वाहतुक करतात. त्यामुळे 80 हजार प्रवाशांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, भोकर, देगलूर, बिलोली, किनवट, माहूर, हदगाव, मुखेड, कंधार येथील एस.टी. आगारामध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या. आगार प्रमुखांची भेट घेऊन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खाजगी बसेसची आवश्यकता असल्यास कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, अशी माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
सराईत वाहन चोरांस क्राईम ब्रँच युनिट दोन कडून अटक
सराईत वाहन चोरांस क्राईम ब्रँच युनिट दोन कडून अटक
पुणे : क्राईम ब्रँचचे पोलिस कर्मचारी शहरात गस्त असताना वाहन...
ज्योतिरादित्य सिंधियाच्या होम टर्फवर, प्रियंका गांधी यांनी “बदलाची प्रचंड लाट” असा दावा केला.
ग्वाल्हेर: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी आज सांगितले की, भाजपशासित मध्य प्रदेशमध्ये बदलाची मोठी लाट आहे,...
चेन्नईला मुसळधार पावसाने झोडपले
चेन्नई शहर आणि उपनगरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. चेन्नईतील दोन तलावातून पाणी सोडण्यात येणार असून प्रशासनाने रविवारी...
गटविकास अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक..
.हिंगोली: हिंगोलीत लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. औंढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांना तक्रार दाराकडून पाच हजार रुपयांची लाच...






