अहमदनगर येथील गोल्ड काउन्सिलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्र करिता अर्ज नाशिक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी (वय ५७, रा. औरंगाबाद), क्षेत्र अधिकारी संशयित कुशल मगननाथ औचरमल (वय ४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.अहमदनगर येथील गोल्ड काउन्सिलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्र करिता अर्ज व मूळ कागदपत्रे दाखल केली होती. यानंतर औरंगाबाद येथील प्रादेशिक अधिकारी तथा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त पदभार सांभाळणारे वर्ग एकचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी व नाशिक येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी कुशल औरचमल यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठून हकीगत सांगत तक्रार अर्ज दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांनी गंभीर दखल घेत तक्रारीची पडताळणी करत सापळा कारवाईचे आदेश दिले. यानंतर पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरूड आदींच्या पथकाने सापळा रचला. लाचखोर जोशी व औरचमल यांनी तक्रारदाराकडून प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच पंचांसमक्ष सातपूर जवळील उद्योग भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात स्वीकारली. यावेळी सापळा कारवाईच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सातपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. यावर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अद्यापपर्यंत झालेली ही पहिलीच सापळा कारवाई आहे. दोन वर्षांपुर्वी अशाच प्रकारे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.औरंगाबाद येथे मुळ नेमणूक ; नाशिकचा अतिरिक्त पदभारप्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी यांची नेमणूक औरंगाबादच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपविण्यात आला होता. यादरम्यान, संमतीपत्र करिता दोघा अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बेकायदेशीरपणे रक्कम अर्जदाराकडून स्वीकारली. यामुळे पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
राज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत
राज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेतमुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे...
मुलाने चिकन करी खाण्याची मागणी केल्याने संतापलेल्या कर्नाटकातील व्यक्तीने त्याची हत्या केली
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात घरी बनवलेला पदार्थ चाखायला मिळत नाही म्हणून भांडण केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या वडिलांनी...
पुणे येथील लोकसेवक प्रवीण मानकर यांना पोलीस कोठडी रिमांड मंजूर
तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर, गु र क्र ९२४/२०२१ मधील आलोसे श्री प्रवीण मानकर राहणार- 102, फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, यास आज...
बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच
.बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच
पुणे: पुणे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली...






