- पैठण येथील जायकवाडी धरणाचे सात आपत्कालीन दरवाजे काल शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान उघडण्यात आल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला असून नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- • गुरुवारी व शुक्रवारी नाशिक परिसरातील धरणातून जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यामुळे जायकवाडी धरणाचा 18 नंबरचा दरवाजा चार फुट, त्याचबरोबर आपत्कालीन 2 ते 8 नंबरचे सात दरवाजे अर्धा फूट उघण्यात आल्याने यंदा पहिल्यांदाच गोदावरी पत्रात 79 हजार 124 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
- काल शुक्रवारी संध्याकाळी तहसीलदार शंकर लाड यांनी महसूल पथकातील मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी आकाश गाडगे, बी. टी. धारकर यांनी धरणात येणाऱ्या पाण्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांच्याकडून घेतल्यावर गोदा काठी असलेल्या आपेगाव, वडवळी, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, पाटेगाव, नायगाव या गावातील नदी काठावर असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले..
- तसेच संभाव्य पूर परिस्थितीमध्ये संबंधित ग्रामसेवक, तलाठी यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या