प्रत्येक व्यक्तीच्या घरात संविधान असले पाहिजे – दुर्गाताई तांबे

प्रत्येक व्यक्तीच्या घरात संविधान असले पाहिजे – दुर्गाताई तांबे

कोपरगाव प्रतिनिधी दि. 26 : संविधानाचे वाचन करून आपल्या आधिकारांच्या माहितीसाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात संविधानाची प्रत ठेवली पाहीजेे कारण संविधानानेच आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे. याचे भान आपण ठेवले पाहिजे, असा सल्ला संगमनेर नगरपालीकेच्या नगराध्यक्षा दुर्गातार्इ तांबे यांनी दिला.
कोपरगाव येथे 26 नोव्हेंबर रोजी समता सभागृहामध्ये आयोजित संविधान दिनानिमित्त संविधान वाचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यापिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव भाजपचे शरदनाना थोरात, अहमदनगर जिल्हा युवक कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष तुषार पोटे,
संगमनेर विद्यार्थी कॉंगे्रस कार्याध्यक्ष व कोपरगांव काँग्रेस समन्वयक शेखर सोसे, कोपरगाव कॉंंगे्रस शहराध्यक्ष सुनिल सांळुके, कोपरगाव तालुका कॉंगे्रसच्या सरचिटणीस सविता विधाते आदी उपस्थित होते.
तांबे पुढे म्हणाल्या की, तुम्हला अिाण मला वेगवेगळया पदावर काम करण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला आहे. समाजातील अनेक विकृत प्रथा नष्ट करण्याचे काम आपल्या राज्यघटनेने केल आहे. यासाठी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानास अभिवादन करते.
कोरोनामुळे सर्वत्र रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक महिलांचे रोजगार बंद पडले. त्या महिलांसाठी कॉंगे्रसपक्षाच्या वतीने व कार्यकर्त्यांमार्फत नियोजन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सहकार्य करावे असे दुर्गा ताई तांबे म्हणाल्या.
दरम्यान संविधान दिन हा गावागावामध्ये सर्व धर्माच्या नागरीकांनी अणि सर्व पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येवुन साजरा केला पाहीजे, तो हेेतू आज साध्य झाला असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केले.
कोयटे पुढे म्हणाले की, संविधानाच्या मुल तत्वानुसार संविधाना प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या संस्थेला समता हे नाव दिले आहे.
दुर्गातार्इ तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका सरचिटणीस सविता विधाते यांच्या माध्यमातुन एकही महिला रोजगाराविना राहणार नाही, त्यासाठी पाहीजे ते मार्गदर्शन, पाहीजे तेवढे अर्थसाहय देण्याचे अश्‍वासन काका कोयटे यांनी दिले. यावेळी तुषार पोटे, शरदनाना थोरात, शेखर सोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कोपरगाव तालुका सरचिटणीस सविता विधाते यांनी संविधानाचे महत्व पटवुन दिले. तसेच तालुक्यातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्‍न वरीष्ठापुढे मांडुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मागासवर्गीय सेलचे तालुकाअध्यक्ष चंद्रकांत बागुल, मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष रविंद्र साबळे, युवक कॉंगे्रसचे तालुकाध्यक्ष जय चांदगुडे, युवक कॉंगे्रसचे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते, युवक कॉंगे्रसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, युवक कॉंगे्रसचे शहर कार्याध्यक्ष गिरीष आकोलकर, विद्यार्थी कॉंगे्रसचे जिल्हा सचिव निरंजन कुडेकर, विद्यार्थी कॉंगे्रसचे तालुकाध्यक्ष जयेश कदम, विद्यार्थी कॉंगे्रसचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद, विद्यार्थी कॉंगे्रसचे शहराध्यक्ष ॠषिकेश पगारे, मनिषा साबळे, आशा पवार, स्नेहल विधाते, दिपाली पगारे, यांचेसह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नानासाहेब मोरे यंानी केले तर आभार महिला कॉंगेसच्या शहराध्यक्षा रेखा जगताप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here