प्रकाश वाईन्सच्या मॅनेजरला लुटणारी टोळी जेरबंद, सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त..
अहमदनगर दिनांक 12 सप्टेंबर रोजी सावेडी रोडवरील प्रकाश वाईन्सचे मॅनेजर आशीर बशीर शेख रात्री 10 वाजण्याचे सुमारास दुकान बंद वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बॅगमध्ये ठेवून घरी जात असताना सारस्वत बँकेजवळ मोटारसायकलवर आलेल्या इसमांनी त्यांना अडवून व त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून 10 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत तोफखाना पो.स्टे.येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांनी तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून वेगवेगळी पथके तयार करुन तपास सुरु केला. त्यानुसार आरोपी लखन नामदेव वैरागर, (वय 29 वर्षे, रा. सेंटमेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर) यास प्रथम ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद बाळू वाघमारे, विशाल भाऊसाहेब वैरागर, दिपक राजू वाघमारे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपींकडून 5 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या तीन मोटार सायकल व चार मोबाईल असा एकूण 9 लाख 2 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सपोनि/सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोना/रवि सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, पोकों/योगेश सातपूते, सागर ससाणे, कमलेश पाथरुट यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.