पोस्ट ऑफिसपोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गॅरंटीसह मिळतात हे सर्व फायदे , घ्या जाणून

455
  • – भारतात कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायचं म्हटलं तरी आपण भरपूर विचार करतो. सुरक्षित योजनेत आपण गुंतवणूक असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण अनेक सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करतो. अशा सरकारी गोष्टीत गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरते.(Post Office Scheme)
  • आज आपण पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना सुरक्षित आहे तसेच चांगला परतावाही देते. जर तुम्हाला दर महिन्याला निश्चित व्याज हवे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करू शकता.
  • जास्तीत जास्त किती रक्कम जमा केली जाऊ शकते?
  • या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 1000 च्या 100 पटीत पैसे जमा करू शकता. जर तुमचे एकच खाते असेल तर तुम्ही फक्त 4.5 लाख रुपयांपर्यंतच पैसे जमा करू शकता. दुसरीकडे, जर तुमचे संयुक्त खाते असेल, तर तुम्ही कमाल 9 लाख रुपये जमा करू शकता.
  • हे खाते कोण उघडू शकेल?
  • मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या खात्यात एकाच वेळी किमान एक आणि जास्तीत जास्त 3 व्यक्ती खाते उघडू शकतात.
  • पोस्ट ऑफिसच्या मासिक योजनेअंतर्गत, तुम्ही तुमचे खाते 5 वर्षांपर्यंत उघडू शकता. येथे पैसे जमा केल्यानंतर किमान 1 वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, तुम्हाला मूळ रकमेच्या 2% वजा केले जातील. दुसरीकडे, 3-5 वर्षांनी ते काढल्यानंतर, तुमच्या मूळ रकमेपैकी एक टक्का कापला जाईल.
  • 50000 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला इतके पैसे मिळतील
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 6.6 टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही तुमच्या खात्यात एकावेळी 50000 रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा सुमारे 275 रुपये आणि वार्षिक 3300 रुपये मिळतील. 5 वर्षात तुम्हाला एकूण 16500 रुपये व्याज मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here