पोलीस भरतीची तयारी करणाऱ्याउमेदवारांसाठी मोठी बातमी, रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा

    96

    मागील काही काळापासून पोलीस भरती रखडलेली होती. मात्र रखडलेली भरती आता पुढच्या काही महिन्यात होऊ शकते, असे संकेत शासनाने दिले आहेत. पोलीस भरतीची तयारी राज्यभरातून लाखो तरुण-तरुणी करीत असतात. पुढच्या काही महिन्यांत पोलीस भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. कारण शासन स्तरावर तयारीसाठीची महत्तपूर्ण बैठक बोलाविण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक बोलविण्यात आली आहे.

    बैठकीसाठी मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस आयुक्त, नागपूर शहर पोलीस आयुक्त, नवी मुंबई पालीस आयुक्त, मीरा भाईंदर, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, नाशिक शहर पोलीस आयुक्त, संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त, अमरावती शहर पोलीस आयुक्त, सोलापूर शहर पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त, नवी मुंबई पालीस आयुक्त, मीरा भाईंदर, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, नाशिक शहर पोलीस आयुक्त, संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त, अमरावती शहर पोलीस आयुक्त, सोलापूर शहर पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.

    भरतीसाठीची पूर्व तयारी झाल्यानंतरराज्य सरकारकडून लवकरच पोलीस भरती संदर्भातील जाहिरात जाहीर होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना दोन टप्पे पार करावे लागतात लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी. यामध्ये लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात. त्यानंतर पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here