
पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यानेच काढली महिला कॉन्स्टेबल ची छेड तक्रार घेण्यास टाळाटाळ
{प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव }
संगमनेर पोलीस स्टेशन येथून घरातच दिवे लावून शेवगांव पोलीस स्टेशन ला मागील वर्षी बदलून आलेला लिंग पिसाट कर्मचारी आता सहकारी महिला कर्मचार्याचीच काढतोय छेड??? दिनांक 14 सप्टेंबर वार गुरवार रोजी रोजी ऑन ड्युटी असताना सहकारी विवाहित महिला कर्मचाऱ्याच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श करून शरीर सुखाची मागणी केली त्या महिला कर्मचाऱ्याने तेथेच त्याचा यथेछ समाचार घेतला आणि रीतसर तक्रार शेवगांव च्या ठाणे अंमलदार यांचेकडे करण्यास सुरवात केली परंतु काही सहकारी महिला आणि पुरुष कर्मचार्यांनी प्रकरण मिटवण्याचा लकेवीलवाना प्रयत्न केला परंतु सदर महिला कर्मचाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांचेकडे धाव घेतली असल्याची चर्चा शहरासह तालुक्यात सुरु आहे
ताजा कलम
सदर पोलीस कर्मचारी संगमनेर येथे नियुक्तीस असताना त्याच्या बायकोनेच त्याच्यावर स्वतःच्या मुलीचीच छेड काढली म्हणून पोस्को आणि लैंगिक शोषणाच्या व अट्रॉसिटी च्या तक्रारी दाखल केल्या होत्या आणि सध्या ती महिला त्याच्याकडे नांदत सुद्धा नाही अशी माहिती मिळाली आता “घरच झालं थोडं आणि व्याह्यांन धाडलं घोड” असा प्रकार संबंधित रत्न { गाजर } पारखी कर्मचाऱ्यासोबत झाला आहे “मी नाही त्यातली आणि बाई छेडली पोलीस स्टेशनातली” असा प्रकार झाल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात खमंग चर्चा सुरु आहे “अश्या लिंग पिसाट कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ केले पाहिजे” आमच्या आया बहिणीची इज्जत ज्यांच्या मुळे सुरक्षित आहे असे आम्ही समजतो तेच बाईच्या पदराला हात घालू लागले तर सर्वसामान्य जनतेने कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असा संतप्त सवाल लोक विचारू लागली आहेत




