पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार

राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले होते. या मुलांची सुटका करण्यासाठी श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे पथकासह गेले असता आरोपीने मिटके यांच्यावर गोळीबार केला.पोलीस उपाधीक्षक संदीप मिटकेया घटनेत उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नानोर यांच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरले होते.पोलीस उपाधीक्षक संदीप मिटकेनानोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. उपअधीक्षक मिटके हे दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिवाल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, ती अधीक्षक मिटके यांचा डोक्याजवळून गेली.पोलीस उपाधीक्षक संदीप मिटकेजिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपी यांनी दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने खंडणी मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी हे कृत्य आरोपीने केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here