पोलीस असल्याची बतावणी करुन दरोडा घालणाऱ्या टोळीतील फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि, दिनांक २७/०५/२०२१ रोजी सकाळी ०६/०० वा. चे सुमारास फिर्यादी श्री. श्रीधर जंगलू सोनवणे, वय ३४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. लतपतराय वाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर हे त्यांचेकडील टेम्पो नं. एमएच-४२ एम ९४८२ यामध्ये लोखंड, अॅल्युमिनियम, पितळ, ताबे असा एकूण ४,९१,३२८/-रु. किं. चा भंगार माल भरुन नगर-मनमाड रोडने अहमदनगर येथे येत असताना शनिशिंगणापूर फाट्याजवळ पाठीमागून इटींगा कारमधून आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादीचा टेम्पो अडवून फिर्यादीस पोलीस असल्याची बतावणी करुन इटींगा गाडीमध्ये बसवून वरवंडी गावचे शिवारात फिर्यादीस सोडून फिर्यादीचा टेम्पो भंगार मालासह दरोडा टाकून चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत राहूरी पो.स्टे. येथे गुरनं. ४१३/२०२१ भादवि भादवि कलम ३९५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी नामे १) तोफीक सत्तार शेख, वय ३५ वर्षे, रा. काजीबाबा रोड, श्रीरामपूर, २) साजीद खालीद मलीक उर्फ मुनचून, वय २४ वर्षे, रा. पापा जलाल रोड, वार्ड नं. २, श्रीरामपूर, ३) जावेद मुक्तार कुरेशी, वय- २४ वर्षे, रा. बजरंग चौक, श्रीरामपूर, ४) शाम भाऊराव साळुंके, वय- २० वर्षे, रा. खटकळी, बेलापूर, ता. श्रीरामपूर, ५) अरबाज जाकिर मन्सूरी उर्फ पिंजारी, वय १९ वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, सुभेदार वस्ती जवळ, श्रीरामपूर यांना राहूरी पो.स्टे. हजर केलेले आहे.
सदर गुन्ह्यातील वरील नमुद आरोपींचा साथीदार शोएब कुरेशी, रा. श्रीरामपूर हा सदरचा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. नमुद फरार आरोपीचा श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि. आरोपी शोएब शेख हा श्रीरामपूर बस स्टैंड परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/ सोमनाथ दिवटे, पोहेकों/सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, पोना/शंकर चौधरी, पोकों / रणजित जाधव, सागर ससाणे, चालक पोहेकॉ/बबन बेरड अशांनी मिळून श्रीरामपूर येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे श्रीरामपूर बस स्टैंड परिसरात आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे शोएब गुलाब कुरेशी, वय २२ वर्षे, रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर यांस ताब्यात घेवून राहूरी पो.स्टे. ला हजर केले आहे. पुढील कार्यवाही राहूरी पो.स्टे. करीत आहेत.
आरोपी शोएब गुलाब कुरेशी याचे विरुध्द यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. २७५/२०१८ भादवि कलम ३९९, ४०२
२) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. ११३/२०१९ भादवि कलम ३२४, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.




