अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील (I.P.S.) यांनी दि. 01/10/2020 रोजी कार्यभार स्वीकारला. मात्र त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी काल दि. 08/10/2020 रोजी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल POSITIVE आला.
मा.पोलीस अधीक्षक यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी तसेच मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष येऊन पाटील यांचे स्वागत करून वार्तालाप केला आहे.
पोलीस अधीक्षक पाटील यांची कोरोना चाचणी POSITIVE आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःबाबत योग्य ती वैद्यकीय खबरदारी घ्यावी,असे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.





