- मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या चित्रीकरणामुळे एकापाठोपाठ एक डमी उमेदवार सापडत आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांचे कनेक्शन समोर येत असून, पोलिस भरतीचे धडे देणाऱ्या खासगी क्लासचा यात सहभाग असल्याचे आढळले आहे.
- ?? औरंगाबाद येथील एका शिक्षकाने तीन उमेदवारांची मैदानी चाचणी दिली. यासाठी त्याने या तीन उमेदवारांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले असल्याने पोलिस या शिक्षकाचा शोध घेत आहेत. अन्यही जिल्ह्यांत या प्रकरणाची व्याप्ती असल्याचा संशय आहे.
- ?? मुंबई पोलिस दलामधील 1,076 शिपाई पदांसाठी 14 नोव्हेंबर 2021 रोजी वेगवेगळ्या केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेला एक लाखांपेक्षा अधिक उमेदवार बसले होते.





