पोलिस उप महानिरिक्षक बी जी शेखर सात दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर
पोलिस ठाण्यासह उपविभागीय कार्यालयाचेही होणार इन्स्पेक्शनवार्षिक निरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांकडून जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या कामकाजाची तपासणी होणार आहे. त्यासाठी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील हे सात दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
दि.१० जानेवारी ते १७ जानेवारी पर्यंत नगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालये तसेच इतर सर्व कार्यालयांची भेट व मुलाखती घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे असल्याचे समजते.
दि. १० जानेवारीपासून कोपरगाव पोलिस ठाण्यात तपासणी व उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती, श्रीरामपूर उपविभाग कार्यालयाचे निरीक्षण व उपविभागातील पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाखती, दिनांक ११ जानेवारीला नेवासा पोलिस ठाण्यात निरीक्षण व शेवगाव उपविभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती, कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षण, दि. १२ जानेवारीला नगर शहर उपविभागातील पोलिस अधिका-यांच्या मुलाखती, श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे निरीक्षण व कर्जत उपविभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखतीदिनांक १३ जानेवारीला पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षण व अहमदनगर ग्रामीण उपविभाग कार्यालयाचे निरीक्षण होणार आहे.
दिनांक १४ जानेवारीला परेड, पोलिस मुख्यालय भेट व अहमदनगर ग्रामीण उपविभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती, दिनांक १५ जानेवारीला कार्यालयीन शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा व इतर शाखांचे निरीक्षण व सदर विभागातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती, तसेच जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हे परिषददिनांक १७ जानेवारीला संगमनेर उपविभाग कार्यालयाचे निरीक्षण व संगमनेर उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती होणार आहेत.
अशी माहिती पोलिसांच्या अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.