पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची बदली
नगर : नगरमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात नगर जिल्ह्यातील प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे बदली झाली आहे.





