पाथर्डीत पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण
पाथर्डी- पाथर्डीत पोलिस अधिकाऱ्यास धक्का लागल्याच्या कारणातून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली.अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी शहरामध्ये गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून एका पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात ज्ञानदेव केळगेंद्र, प्रकाश केळगेंद्र, सचिन केळगेंद्र, अक्षय केळगेंद्रे आदिसह 9 जणांविरुद्ध मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी देणे तसेच खिशातील पैसे बळजबरीने काढून घेणे या कारणाखाली दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मारहाण झालेले संदीप भगवान फुंदे हे मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून पाथर्डी शहरातील शेवगाव – पाथर्डी रस्त्यावर ही घटना घडली. पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे हे या घटनेचा तपास करत आहेत