पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या.

डहाणू : ‘मोबाईलचा वापर कमी करून करियरकडे लक्ष दे’ असे पालकांनी सांगताच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांच्या मुलाने घरच्या टेरेस वरून उडी घेऊन आत्महत्या केली. प्रज्वल प्रकाश सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रकाश सोनवणे हे घोलवड पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. प्रज्वल प्रकाश सोनवणे विस वर्षीय मुलास ‘मोबाईलचा वापर कमी करून करियरकडे लक्ष दे’ असे पालकांनी सांगितले होते. त्याचा मनात राग धरून प्रज्वल याने रात्रीच्या वेळेस राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवरुन उड़ी मारून आत्महत्या केली. तर प्रज्वलच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here